क्रीडा व मनोरंजन

सकल जैन समाजातील युवकांनी संघटित होऊन समाजहितासाठी कार्य करावे – किशोर बाबू दर्डा

सहाव्या महावीर प्रीमियर लीग सीझन ६ चे थाटात उद्घाटन

 

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज

श्री महावीर युवक मंडळ, यवतमाळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महावीर प्रीमियर लीग सीझन ६ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तळेगाव भारी ग्राउंड, यवतमाळ येथे अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाले.

 

या स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष ॲड. प्रियदर्शनी उईके, लोकमत समूहाचे जिल्हाप्रमुख तथा सकल जैन समाजाचे संयोजक किशोर बाबू दर्डा, जैन सेवा समितीचे अध्यक्ष महावीरजी भन्साली, यवतमाळ जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. संजय सिसोदिया, उद्योजक अरुणभाई खारा, महेंद्रजी सुराणा संदीपजी तातेड, डॉ. रमेश खिवसरा, महिला समितीच्या सौ. चंदा कोटेचा, महावीर नवयुवक मंडळाचे अध्यक्ष समर्पण गांधी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

युवकांनी संघटित व्हावे – किशोर बाबू दर्डा

उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना किशोर बाबू दर्डा म्हणाले की, सकल जैन समाजातील युवकांनी एकजूट होऊन एक सशक्त संघटना उभारावी व त्या माध्यमातून समाजहिताचे कार्य करावे. जिल्हास्तरावर युवकांचे अधिवेशन आयोजित करून समाजाच्या उन्नतीसाठी युवा पिढीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा

आयोजकांचे मुक्तकंठाने कौतुक

प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना नगराध्यक्ष ॲड. प्रियदर्शनी उईके यांनी या स्पर्धेचे भरभरून कौतुक केले. समाजातील युवकांसाठी अशा प्रकारचे क्रीडा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

बलाढ्य संघांचा सहभाग

या स्पर्धेत रॉयल किंग्स, लोढा लॉयन्स, आर.के. चॅलेंजर्स, गुरुदेव अवेंजर्स, परंपरा जेम्स, यश इन्व्हेस्टमेंट आणि जम्मू हे बलाढ्य संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक सामना चुरशीचा ठरणार असून क्रिकेटप्रेमींसाठी ही स्पर्धा पर्वणी ठरणार आहे.

आकर्षक बक्षिसांची रेलचेल

विजेत्या संघाला विनादेवी दर्डा स्कूल यांच्या वतीने प्रथम पुरस्कार, तर द्वितीय पुरस्कार जैन सेवा समिती, यवतमाळ यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच, संपूर्ण स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज असे आकर्षक पुरस्कार ठेवण्यात आले आहेत.

मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती

उद्घाटनप्रसंगी श्याम भन्साली, विजय लोढा, प्रसन्न सुराणा, प्रमोद तातेड, कमलकिशोर बंम्ब, राजेंद्र गांधी, विजयकुमार बुंदेला, उमेश बैद आशिष बोरा, नगरसेवक पंकज ननवाणी, पवन बोथरा, राजेंद्र गेलडा, सुनील भरुट, कस्तुर सेठीया यांच्यासह सकल जैन समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या क्रिकेट स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन महावीर नवयुवक मंडळाचे अध्यक्ष समर्पण गांधी, सचिव पियुष तातेड, कोशाध्यक्ष दीपक बोरा व सर्व सदस्यांनी यवतमाळकरांना केले आहे. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन तिलकराज गुगलीया यांनी केलेस्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी सकल जैन समाजाचे आधारस्तंभ किशोर बाबु दर्डा यांनी गोलंदाजी केली तर नगराध्यक्ष एडवोकेट प्रियदर्शनी उईके यांनी फलंदाजी केली…

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!