दर्जेदार शिक्षणाची विश्वासार्ह ओळख जोश बिझनेस कार्निवलमध्ये बिरला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूलचे भव्य सादरीकरण

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
जोश बिझनेस कार्निवल कम एक्सपोमध्ये बिरला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूलने आकर्षक व माहितीपूर्ण स्टॉलच्या माध्यमातून आपल्या दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणपद्धतीची प्रभावी ओळख करून दिली. या उपक्रमामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये शाळेबाबत विशेष आकर्षण निर्माण झाले.
शाळेची मूल्याधिष्ठित, सर्वांगीण व भविष्योन्मुख शिक्षणप्रणाली या स्टॉलद्वारे सविस्तरपणे मांडण्यात आली. मजबूत शैक्षणिक पाया, जीवनकौशल्यांचा विकास, सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास यावर बिरला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये दिला जाणारा भर उपस्थितांना विशेष भावला.
ही संपूर्ण सहभागिता शाळेच्या प्राचार्या सोनल शर्मा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. यावेळी शिक्षकवृंद — जय कपिले, श्रद्धा बदारे, श्वेता पाटील, नेहा थोरात, रेनुका खोंड, सुदीक्षा राजा, शीतल जाधव, अचल लबशेटवार व प्रतीक्षा हालबले — यांनी पालकांना अभ्यासक्रम, उपक्रम, शैक्षणिक सुविधा व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासंदर्भात सखोल माहिती दिली.
स्टॉलला भेट देणाऱ्या अनेक पालकांनी आपल्या पाल्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी बिरला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूलकडे सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला. आधुनिक शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची तयारी करून देणारी शाळा म्हणून बिरला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूलने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आगामी शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालकांनी बिरला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूलला भेट देऊन माहिती घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


