एका स्त्रीची एक अतिशय सुंदर सवय होती…
कॉटनसिटी न्यूज :
एका स्त्रीची एक अतिशय सुंदर सवय होती…
ती रोज झोपण्याआधी दिवसभरात घडलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी एका वहीत लिहीत असे ✍️
ती त्या गोष्टींना तक्रार न मानता, ईश्वराची कृपा म्हणून पाहत असे 💖
ती लिहीत असे —
🌿 मी फार सुखी समाधानी आहे…
माझा पती रात्री मोठ्याने घोरतो, कारण त्याला गाढ आणि शांत झोप लागते.
सुखाची झोप ही मोठी देणगी आहे… ही ईश्वराची कृपा 🙏
🌿 मी फार सुखी समाधानी आहे…
माझा मुलगा सकाळी भांडतो की रात्रभर मच्छर झोपू देत नाहीत.
म्हणजे तो रात्री घरी असतो, सुरक्षित असतो, वाईट सवयींपासून दूर असतो…
ही ईश्वराची कृपा 🙏
🌿 मी फार सुखी समाधानी आहे…
दर महिन्याला लाईट, गॅस, पाणी, पेट्रोलची बिलं भरताना दमछाक होते,
कारण त्या सगळ्या सुविधा माझ्या वापरात आहेत.
ज्यांच्याकडे या सोयी नाहीत, त्यांचं आयुष्य किती कठीण असेल…
ही ईश्वराची कृपा 🙏
🌿 मी फार सुखी समाधानी आहे…
दिवसभर काम करून शरीर थकून जातं,
पण माझ्याकडे काम करण्याची ताकद आहे
आणि ज्यांच्यासाठी मेहनत करावी अशी माणसं आहेत…
हीच खरी श्रीमंती आहे. ही ईश्वराची कृपा 🙏
🌿 मी फार सुखी समाधानी आहे…
रोज घर झाडावं लागतं, केर-कचरा काढावा लागतो,
घर साफ करावं लागतं…
कारण माझ्याकडे स्वतःचं घर आहे, डोक्यावर छत आहे.
ज्यांच्याकडे घर नाही, त्यांचं काय होत असेल…
ही ईश्वराची कृपा 🙏
🌿 मी फार सुखी समाधानी आहे…
कधीतरी लहान-मोठा आजार होतो,
पण लगेच बरी होते…
माझं शरीर मला साथ देतं, माझं आरोग्य चांगलं आहे…
ही ईश्वराची कृपा 🙏
🌿 मी फार सुखी समाधानी आहे…
प्रत्येक सणाला भेट देताना पर्स रिकामी होते,
कारण माझ्या आयुष्यात नाती आहेत,
माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत…
जर ही नाती नसती तर आयुष्य किती वैराण झालं असतं!
ही ईश्वराची कृपा 🙏
🌿 मी फार सुखी समाधानी आहे…
दररोज पहाटे अलार्म वाजतो आणि मी उठते,
कारण मला पुन्हा एक नवी सकाळ, नवी संधी मिळते…
ही देखील ईश्वराचीच कृपा 🙏
✨ आपण ज्या गोष्टींना दुःख, त्रास, ओझं समजतो
त्याच गोष्टी कुणाच्या तरी आयुष्यातील स्वप्न असतात.
ब्रह्मांडाचा (Cosmic Energy) एक सुंदर नियम आहे —
👉 जितक्या मनापासून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता,
👉 तितक्याच पटीने आनंद, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे परत येते.
🌸 दुःख कमी करायचं असेल तर परिस्थिती नाही, दृष्टीकोन बदला.
🌸 कृतज्ञता हीच खरी उपचारशक्ती आहे.
जर तुम्हालाही…
✔️ सतत ताण-तणाव
✔️ पचनाच्या समस्या, थकवा, सूज, वजन वाढ
✔️ नकारात्मक विचार, अस्वस्थ मन
✔️ शरीर-मन-आत्मा यांचा समतोल हवा असेल
तर योग्य मार्गदर्शन तुमचं आयुष्य बदलू शकतं 💚
मी Holistic & Gut Health Coach म्हणून
आहार, जीवनशैली आणि विचारपद्धतीत छोटे बदल करून
आरोग्यदायी आणि आनंदी जीवनासाठी मार्गदर्शन करते 🌿
📞 संपर्क : डॉ. कल्पना दिलीप कुलरे
🌿 Holistic & Gut Health Coach
📱 9881687195
✨ हा संदेश वाचा, मनात साठवा…
आणि गरज वाटल्यास नक्की संपर्क करा.
कदाचित हीच सुरुवात तुमच्या आयुष्यातील सकारात्मक बदलाची असेल 🙏💫
#मी_सुखी_समाधानी
#ईश्वराची_कृपा
#कृतज्ञता
#GratitudeHealing
#दृष्टीकोन_बदला
#आनंद_शोधा
#HolisticLiving
- #GutHealthMatters



