विद्यार्थ्यांसाठी भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन स्व. डॉ. गायत्री काळे फाउंडेशन, यवतमाळचा उपक्रम

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
स्व. डॉ. गायत्री काळे फाउंडेशन, यवतमाळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या निबंध स्पर्धेचा विषय
“वर्तमान शिक्षणात पालक आणि युवकांची भूमिका”
असा असून सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत पालक व विद्यार्थ्यांपुढे निर्माण होणाऱ्या संभ्रम, मानसिक तणाव आणि करिअरविषयक आव्हानांवर सकारात्मक विचार मांडण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळणार आहे.
आजच्या काळात उच्च शिक्षण घेतल्यानंतरही अपेक्षित नोकरी न मिळाल्याने पालक व युवक दोघेही चिंतेत सापडतात. यामुळे कुटुंबात तणाव व वैफल्य निर्माण होते. अशा परिस्थितीत उद्योग-व्यवसाय, पत्रकारिता, कला-संस्कृती यांसारख्या विविध क्षेत्रांत उपलब्ध असलेल्या नव्या संधींचा विचार करून, आवडीचे क्षेत्र निवडून यशस्वी वाटचाल कशी करता येईल, याबाबत उन्नत व प्रेरणादायी विचार मांडणे अपेक्षित आहे. याच उद्देशाने ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जाणार असूनप्रथम पारितोषिक: ₹1000 व स्मृतिचिन्हद्वितीय पारितोषिक: ₹700 व स्मृतिचिन्हतृतीय पारितोषिक: ₹500 व स्मृतिचिन्हअशी पारितोषिकांची रचना आहे.निबंध पाठविण्याची अंतिम मुदत 31 जानेवारी 2026 असून निबंधस्व. उत्तमराव पाटील क्रेडिट को-ऑपरेटिव्ह संस्था, तिरंगा चौक, यवतमाळया पत्त्यावर पाठवावेत.ही स्पर्धा 16 वर्षांवरील सर्वांसाठी खुली असून निबंधावर सहभागी स्पर्धकाचा मोबाईल व व्हॉट्सअॅप क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांना एका विशेष कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क :सतिश माधवराव काळे – 9423655004विजय सदाशिव वीसपुते – 7218927959योगेश दिघडे – 7709257286तेजस मारोडे – 8605133456शिक्षणाबाबत सकारात्मक व उन्नत विचारांची बीजपेरणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्व. डॉ. गायत्री काळे फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश माधवराव काळे यांचे वतीने करण्यात आले आहे.



