ताज्या घडामोडी

*वाधवानी फार्मसी महाविद्यालयात एडस्सा अंतर्गत बुध्दिबळ स्पर्धेचे यशस्वी आयोजन*

 

 

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज

दिनांक २ फेब्रुवारी रोजी स्थानिक पी. वाधवानी फार्मसी महाविद्यालयात इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट असोसिएशन एडस्सा, बूध्दिबळ एच झोनल टूर्नामेंट अंतर्गत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ तंत्रशिक्षण संचालनालय प्रादेशिक कार्यालय अमरावती व पी. वाधवानी फार्मसी महाविद्यालययांच्या संयुक्त विद्यमाने बुध्दिबळ स्पर्धेचे यशस्वी आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ह्या स्पर्धेमध्ये तंत्रशिक्षण संचालनालय प्रादेशिक कार्यालय अमरावती अंतर्गत येणाऱ्या 11 संस्थेतील 55 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेकरिता राष्ट्रीय स्तरीय राज्यस्तरीय तसेच विद्यापीठ स्तरीय निवडक 4 पंचांना पाचारण करण्यात आले होते. पंचामध्ये श्री सूशांत सूर्यवंशी. सामनाधिकारी डॉ. किशोरी केळापूरे, पंच सौ. अर्चना आंबूलकर, पंच श्री. तूषार भैसारे पंच ह्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाची सुरुवात दिनांक २ जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान यवतमाळ जिल्हा विकास समितीचे अध्यक्ष श्री जगदीशजी वाधवानी यांनी भूषविले. तर कार्यक्रमा च्या प्रमुख पाहुणे म्हणून पी. वाधवानी फार्मसी महाविद्यालय मोहा फाटाचे प्राचार्य डॉ. अनिल चांदेवार हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनीषा किटुकले यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. स्वागत सोहळा महाविद्यालयाच्या सभागृहा मध्ये पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जगदीश जी वाधवानी यांनी लाल फित कापून तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मनीषा किटुकले यांनी सरस्वती पूजन करून केले अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ अनिल चांदेवार यांनी विविध क्रीडा प्रकारांचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर होणार परिणाम ह्यावर दृष्टिक्षेप टाकला. त्याच बरोबर महाविद्यालयाला स्पर्धेच्या यशस्वी आयोजन करिता व विद्यार्थ्यांना त्यांच्या स्पर्धेतील उत्स्फूर्त सहभागा बद्दल शुभेच्छा दिल्या.

या नंतर महाविद्यालया तर्फे आयोजित बूध्दिबळ स्पर्धेत महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ तर्फे एच झोन मध्ये सहभागी संस्थेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला एक दिवसीय स्पर्धे मध्ये एकूण 10 सामने खेळविण्यात आले त्यामध्ये उपांत्य पूर्वफेरीसाठी शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ, शासकीय तंत्रनिकेतन खामगांव, शासकीय तंत्रनिकेतन आर्वि, सूशगंगा तंत्रनिकेतन वणी अंतिम फेरीसाठी त्यातून पात्र ठरलेल्या शासकीय तंत्रनिकेतन आर्वि व शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळ चमुत अंतिम सामना खेळल्या गेला अत्यन्त चुरशीच्या ठरलेल्या ह्या सामन्यात शासकीय तंत्रनिकेतन आर्वि हा चमुविजयी ठरला अंतिम सामना खेळून झाल्या नंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सभागृहात पार पडला यामध्ये सर्व विजयी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. अनिल चांदेवार व प्राचार्या डॉ. मनीषा किटुकले यांच्या द्वारे ट्रॉफी व प्रशस्ती पत्र वितरित करण्यात आले स्पर्धेचे सुत्र संचलन प्रा. श्री आकाश ढोके ह्यांनी केले तसेच स्पर्धेचे आभार प्रदर्शन प्राध्यापक श्री. दिनेश वरंगंटीवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना करिता महाविद्यालयातील प्रा. श्री. संजय चर्जन, प्रा. प्रशांत गिरडकर, प्रा. रूपाली चव्हाण, प्रा.. नितीन चांदेकर, प्रा.. ऋषिकेश वानोळे प्रा. गिरीश दारव्हेकर प्रा. गजानन राठोड, प्रा. दिव्यजा देशमूख प्रा. खांदेश्वर प्रा. पूजा देवाणी प्रा. मनोज ठाकरे प्रा. रानी फसाटे यांनी काम पाहिले

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!