सहावी महावीर प्रीमियर लीग स्पर्धा: रॉयल्स किंग्स विजयी, गुरुदेव अवेंजर्स उपविजेता समाजसेवेसह महावीर प्रीमियर लीगचे विशाल आयोजन प्रेरणादायी – आमदार बाळासाहेब मांगुळकर

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज प्रतिनिधी
श्री महावीर युवक मंडळ, यवतमाळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महावीर प्रीमियर लीग सीझन ६ या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन १५ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान तळेगाव भारी मैदान, यवतमाळ येथे अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले.
१८ जानेवारी रोजी झालेल्या अंतिम सामन्यात श्याम भन्साली प्रायोजित रॉयल्स किंग्स संघाने विजेतेपद पटकावले, तर गुरुदेव अवेंजर्स संघ उपविजेता ठरला.
या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी लोकमत समूहाचे जिल्हाप्रमुख व सकल जैन समाजाचे संयोजक किशोर बाबू दर्डा अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार बाळासाहेब मांगुळकर, यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजयकुमार बुंदेला, लोकमत सखी मंचच्या जिल्हाप्रमुख सीमा दर्डा, जैन सेवा समितीचे कोषाध्यक्ष प्रशांत दर्डा, यवतमाळ जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. संजय सिसोदिया, अखिल भारतीय मारवाडी महिला मंडळाच्या अध्यक्षा वनिता भरूट, गुजराती समाजाचे अध्यक्ष चेतन पारेख, ॲड. रवी शेखर बदनोरे, ॲड. संजय कोचर, उद्योजक विपुल खिवसरा, महावीर नवयुवक मंडळाचे अध्यक्ष समर्पण गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात किशोर बाबू दर्डा यांनी सकल जैन समाजाने एकसंघ होऊन सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले. “जो जिता वो सिकंदर, जो हारा वो भी बडा सिकंदर” असे सांगत त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अतिथी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी समाजसेवेसह क्रीडा क्षेत्रातही सकल जैन समाज पुढे येत असल्याचे गौरवोद्गार काढत या स्पर्धेचे आयोजन प्रेरणादायी असल्याचे सांगितले. युवकांसाठी असे उपक्रम अत्यंत प्रेरक ठरतात, असेही त्यांनी नमूद केले.
बलाढ्य संघांचा सहभाग
या स्पर्धेत रॉयल्स किंग्स, लोढा लॉयन्स, आर.के. चॅलेंजर्स, गुरुदेव अवेंजर्स, परंपरा जेम्स, यश इन्व्हेस्टमेंट व जम्मू हे बलाढ्य संघ सहभागी झाले होते.
आकर्षक बक्षिसांची रेलचेल
विजेत्या संघाला विनादेवी दर्डा स्कूल यांच्या वतीने ₹41,000 चे प्रथम पारितोषिक, तर उपविजेत्या संघाला जैन सेवा समिती, यवतमाळ यांच्या वतीने ₹31,000 देण्यात आले.
संपूर्ण टूर्नामेंटची ट्रॉफी स्व. भावेश भरूट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भरूट परिवाराच्या वतीने प्रदान करण्यात आली.
तसेच प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आले. स्वर्गीय रक्षा विजयकुमार बुंदेला स्मृतिप्रीत्यर्थ संपूर्ण स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन (₹1001), बेस्ट बॉलर (₹1001) व मॅन ऑफ द सिरीज (₹3001) हे रोख पुरस्कार विजयकुमार बुंदेला यांच्या वतीने प्रदान करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महावीर नवयुवक मंडळाचे अध्यक्ष समर्पण गांधी, सचिव पियुष तातेड, कोषाध्यक्ष दीपक बोरा तसेच कुणाल पोकर्णा, आशीष देसाई, यश भरूट, तिलकराज गुगलिया, अंशूल तातेड, यश दोशी, मधुर सिसोदिया, आनंद काकलिया, रिंकूश तातेडहर्ष भरूट, महावीर दर्डा, कुणाल पोकरणा, आदेश बोरुंदिया, अक्षय लोढ़ा, वैभव लोढ़ा, गौरव लोढ़ा आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिलकराज गुगलिया यांनी केले, तर आभार प्रदर्शन दीपक बोरा यांनी केले.



