ताज्या घडामोडी

जन्मदात्या बापानेच मुलीला मृत्यूकडे ढकलले? हेलियम सिलिंडर देऊन आत्महत्येचा मार्ग दाखवल्याचा धक्कादायक आरोप

 

वर्धा/यवतमाळ

कॉटन सिटी न्यूज प्रतिनिधी

ज्या बापाने मुलीला जन्म दिला, त्याच बापाने तिला मृत्यूकडे ढकलल्याचा संतापजनक प्रकार वर्धा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. नक्षत्रा अरुण वानखेडे या तरुणीने 6 डिसेंबर 2025 रोजी आत्महत्या केली. या आत्महत्येसाठी तिचे वडील डॉ. अरुण वानखेडे हेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप तिची आई डॉ. सुषमा वानखेडे यांनी केला आहे.

नक्षत्राला सतत मानसिक व शारीरिक छळ करण्यात येत होता. इतकेच नव्हे, तर बापानेच तिला हेलियम गॅसचा सिलिंडर देऊन, तो कसा वापरायचा याचा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पाठविल्याचा धक्कादायक दावा आहे. “तू मरून जा,” असे शब्द वापरून तिला रोज अपमानित केले जात होते, असा आरोप आहे.

या प्रकरणी तक्रार दाखल होऊनही राजकीय दबावामुळे अद्याप एफआयआर नोंदविण्यात आलेला नाही. मुलीला न्याय मिळावा यासाठी आई डॉ. सुषमा वानखेडे यांची लढाई सुरू आहे

 मानवधिकार संघटना तसेच महिला आयोगाकडे सुद्धा या प्रकरणाची रीतसर तक्रार त्यांनी केली आहे सावंगी मेघे पोलिस निरीक्षकांनी याप्रकरणी अद्याप पर्यंत गुन्हा का नोंदवला नाही याकरिता फिर्यादी डॉक्टर सुषमा वानखेडे ही गृहमंत्र्यांनाच याचा जाब विचारणार आहे 

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा
शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!