ताज्या घडामोडी

यवतमाळात मराठी–वऱ्हाडी भाषा जिल्हा साहित्य संमेलनाचे भव्य आयोजन

यवतमाळ कॉटन सिटीन्यूज

यवतमाळ शहरात मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून मराठी–वऱ्हाडी भाषा जिल्हा साहित्य संमेलन ४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. लाका बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था, यांच्यावतीने समर्थ प्राईड सभागृह येथे हा साहित्य महोत्सव होणार असून साहित्यप्रेमींसाठी वैचारिक, सांस्कृतिक आणि भाषिक मेजवाणी सादर केली जाणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी राज्य मंत्री मा. मदनभाऊ येरावार यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी मा. प्रा. राजूभाऊ तोडसाम, आमदार, आर्णी–केळापुर उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य मा. डॉ. प्रमोद मुनघाटे आणि मा. डॉ. मार्तंड कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेत एकापेक्षा एक अशी साहित्यिक सत्रे घेण्यात येणार आहेत. यात खालील कार्यक्रमांचा समावेश आहे :
• परिसंवाद : ‘मराठी भाषा महाराष्ट्र धर्म’
• चर्चासत्र : ‘मराठी भाषा रोजगार व शैक्षणिक क्षेत्रातील उपयोग’
• ग्रामगीता लोकसाहित्य प्रस्तुती
• वऱ्हाडी कवी कट्टा
संमेलनातून मराठी भाषेचा प्रचार–प्रसार व संवर्धन साधला जाणार असून मराठी–वऱ्हाडी भाषिक परंपरेला नवीन उर्जा प्राप्त होणार आहे. या साहित्य सोहळ्यात अनेक मान्यवर साहित्यिक, विचारवंत व कवी सहभागी होत असून वैचारिक देवाणघेवाण आणि साहित्यिक चिंतनाचा समृद्ध अनुभव सहभागींस मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!