वॉर्ड १२ मध्ये भाजपचा विजय होताच शिंदे प्लॉट परिसरात नगरसेवक विजय राय याचे स्वच्छता मोहिमेला सुरुवात

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १२ मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष विजय राय यांनी प्रचंड मताधिक्याने विजय संपादन केला. निवडणुकीनंतर त्वरित नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत नवनिर्वाचित नगरसेवक विजय भाऊ राय यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे प्लॉट परिसरात स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
ही स्वच्छता मोहीम नगरसेवक विजुभाऊ राय व योगेश भाऊ भावे यांच्या देखरेखीखाली राबवली जात असून परिसरातील रस्ते, नाल्या व सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई धुमधडाक्यात सुरू आहे. परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.
या कामामुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिक व मतदारांमध्ये समाधान व्यक्त होत असून, निवडणुकीदरम्यान दिलेले शब्द नवनिर्वाचित नगरसेवक विजय भाऊ राय पाळत असल्याबद्दल नागरिकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.



