जगदंबा अभियांत्रिकीत येणार सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री स्पृहा जोशी

यवतमाळ कॉटन सिटी न्यूज
स्थानिक जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षीक स्नेहसंमेलन ‘विंग्स २६’ चे आयोजन २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले असून दिनांक ३१ डिसेंबर ला बक्षिस वितरण सोहळ्या करीता मराठी चित्रपटसृष्टीची सुप्रसिद्ध सिने तारीका स्पृहा जोशी उपस्थित राहणार आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी माय बाप, मोरया, सुर राहुं दे, बायस्कोप, पैसा पैसा, लॉस्ट अॅण्ड फाऊंड, मला काहिच प्रॉब्लेम नाही, देवा एक अतरंगी, होम स्वीट होम, विक्की वेलिंगकर, अटकन चटकन, कॉफी, एका लग्नाची दुसरी गोष्ट, उंच माझा झोका, एका लग्नाची तीसरी गोष्ट, सुख कळले, सुर नवा ध्यास नवा यांसारख्या चित्रपट व टि. व्हि. सिरियल मध्ये भुमिका साकारुन आपल्या अभिनयाची छाप रसिकांवर उमटवलेली आहे.
या वर्षी स्नेहसंमेलनात फॅशन शो, नृत्य स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, जेसीईटी झुम, डिबेट, अंताक्षरी, नाट्यस्पर्धा, कबड्डी, क्रिकेट, खो-खो, फुटबॉल आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वार्षीक स्नेहसंमेलन विंग्स २६’ च्या बक्षिस वितरण सोहळयामध्ये क्रिडा स्पर्धाच्या विजेत्यांना पारितोषिके तसेच अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२५ च्या परिक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार स्पृहा जोशी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
महाविद्यालयामध्ये येत असलेल्या सुप्रसिद्ध सिने तारीकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण आहे. उपस्थित राहणाऱ्या पाहुन्यांच्या स्वागताकरीता महाविद्यालयीन प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याची माहीती संस्थेचे सचिव डॉ. शितल वातीले यांनी दिली.


